Shortage Of Condoms : जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून नोंद झालेल्या भारतात काही रिपोर्ट्समधून भारतात (Shortage Of Condoms) कंडोमचा तुटवडा जाणवणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. येत्या काळात देशात कंडोमची कमतरता (Shortage Of Condoms) भासणार असल्याचा दावा या रिपोर्ट्समधून केला जात आहे.
हे ही वाचा 👉🏻: Winter Health Tips : हिवाळ्यातील कुठल्या वेळेतील ऊन आपल्या शरीरासाठी फायदेशीर?
सेंट्रल मेडिकल सर्व्हिसेस सोसायटी (CMSS)
केंद्रीय खरेदी एजन्सी, सेंट्रल मेडिकल सर्व्हिसेस सोसायटी (CMSS), वेळेवर गर्भनिरोधकांचा पुरवठा (Supply of Contraceptives) करण्यात अयशस्वी ठरल्याचाही दावा या रिपोर्ट्समधून करण्यात आला आहे. यामुळे भारताच्या कुटुंब नियोजन कार्यक्रमावर (Family Planning Program) गंभीर परिणाम होईल, असेही म्हटले जात आहे. मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health) हे वृत्त फेटाळून लावले आहे.
ऑल इंडिया कंडोम मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, ज्यामध्ये कंडोम ब्रँड ‘निरोध’ बनवणारी कंपनी देखील समाविष्ट आहे, त्यांनी सरकारला पत्र लिहून कळवले होते की, CMSS कंडोम खरेदी करण्यात अयशस्वी ठरल्याचा दावाही रिपोर्ट्समधून करण्यात आला आहे. मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने असे वृत्त चुकीचे आणि दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे.
Shortage Of Condoms वर आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे..
आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की, सरकारकडे गर्भनिरोधक औषधांचा जो सध्याचा साठा आहे. राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रमाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, मंत्रालयाच्या विविध कार्यक्रमांसाठी CMSS विविध औषधं आणि वैद्यकीय वस्तू खरेदी करते आणि त्यांची निविदा प्रक्रिया तसेच, पुरवठ्याच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जाते.
नवी दिल्लीत CMSS एक स्वायत्त संस्था आहे. जी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येते. केंद्रीय खरेदी एजन्सी राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमासाठी कंडोम खरेदी करते. CMSS ने मे २०२३ मध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रमासाठी ५.८८ कोटी कंडोम खरेदी केले आहेत. सरकारकडे सध्या उपलब्ध असलेल्या कंडोमची संख्या कुटुंब नियोजन कार्यक्रमाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी आहे. सध्या, NACO (National Aids Control Organisation) ही संस्था M/S HLL Lifecare लिमिटेड कंपनीकडून ७५ टक्के मोफत कंडोम पुरवठा करत आहे आणि CMSS २०२३-२४ साठी उर्वरित २५ टक्के कंडोम नुकत्याच मिळालेल्या मंजुरीच्या आधारे पुरवणार आहे.
हे ही वाचा 👉🏻: RBIआरबीआयने फोन पे आणि गुगल पे व्यवहाराची वाढवली मर्यादा;
Shortage Of Condoms असे वृत्त…
ऑल इंडिया कंडोम मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, ज्यामध्ये कंडोम ब्रँड ‘निरोध’ बनवणारी कंपनी देखील समाविष्ट आहे, त्यांनी सरकारला पत्र लिहून कळवले होते की, CMSS कंडोम खरेदी करण्यात अयशस्वी ठरल्याचा दावाही रिपोर्ट्समधून करण्यात आला आहे. मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने असे वृत्त चुकीचे आणि दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे.
#HealthForAll
𝐌𝐲𝐭𝐡 𝐯𝐬. 𝐅𝐚𝐜𝐭𝐬
Media reports claiming failure in procuring contraceptives are Ill-informed & Misleading
Present stock position of contraceptives is sufficient to meet the requirement of National Family Planning Programme
Union Health Ministry closely… pic.twitter.com/3WPg4tP7bM
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) December 12, 2023
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येते. केंद्रीय खरेदी एजन्सी राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमासाठी कंडोम खरेदी करते. CMSS ने मे २०२३ मध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रमासाठी ५.८८ कोटी कंडोम खरेदी केले आहेत. सरकारकडे सध्या उपलब्ध असलेल्या कंडोमची संख्या कुटुंब नियोजन कार्यक्रमाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी आहे. सध्या, NACO (National Aids Control Organisation) ही संस्था M/S HLL Lifecare लिमिटेड कंपनीकडून ७५ टक्के मोफत कंडोम पुरवठा करत आहे आणि CMSS २०२३-२४ साठी उर्वरित २५ टक्के कंडोम नुकत्याच मिळालेल्या मंजुरीच्या आधारे पुरवणार आहे.