Laptop Tips | सध्याच्या तंत्रज्ञानाच्या जगात लॅपटॉप हा सहज वापरला जातो. कामाच्या ठिकाणांपासून मुलांच्या शाळेच्या ठिकाणी, गेमिंगसाठी लॅपटॉप महत्त्वाचा असतो. आपण लॅपटॉपवर इतके अवलंबून असतो की, अचानक लॅपटॉप बंद झाल्यावर काय करायचे सुचत नाही.
कारमध्ये (Car) प्रवास करताना फोन सहज चार्ज होतो परंतु, लॅपटॉप चार्ज करता येत नाही. फोन चार्ज करताना यूएसबी पोर्टमध्ये प्लग करुन चार्ज करा किंवा कार चार्जच्या मदतीने मोबाइल चार्ज करता येतो. परंतु, प्रवास (Travel) करताना कारमध्ये लॅपटॉप (Laptop) कसा चार्ज होऊ शकतो.
तुम्ही कारमध्ये लॅपटॉपवर काम करत असताना अचानक बॅटरी संपली तर काय कराल? लॅपटॉपला चार्ज कसे करणार? यासाठी प्रवास करताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे.
लॅपटॉपसाठी कार चार्जर मिळते. हा चार्जर तुम्हाला कारमध्येच ठेवावा लागतो. ज्यामुळे तुमच्या लॅपटॉपची बॅटरी संपली तर तुम्ही कारमधील लॅपटॉप सहज चार्ज करु शकता. यासाठी तुम्हाला कोणता चार्जर खरेदी करावा लागेल हे पाहूया
सेप्टिक्स 200W कार लॅपटॉप चार्जर (Laptop Tips)
तुम्हाला हा कार लॅपटॉप चार्जर Amazon वर मिळेल. हा चार्जर १८ महिन्यांच्या वॉरंटीसह मिळेल. सध्या Amazon ची साइट तुम्हाला सूट देत आहे. हा चार्जर साधरणत: २२९९ रुपयांना विकला जात आहे.
New Car Price | फोरव्हिलर कार घेण्याचा विचार आहे घाई करा; २ दिवसानंतर महाग होणार
CAZAR कार लॅपटॉप चार्जर (Laptop Tips)
हा चार्जर फ्लिपकार्टवर विकला जात आहे. यामध्ये ५० टक्के डिस्काउंटनंतर हा चार्जर २४७९ रुपयांना खरेदी करता येईल. हा चार्जर ओवर वोल्टेज प्रोटेक्शन, ओवरलोड प्रोटेक्शन, लो वोल्टेज प्रोटेक्शन, शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन आणि ओवर हीटिंग प्रोटेक्शन मिळेल.