Ladli Bahna Yojana : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशात एकहाती विजय मिळवलाय. विशेषत: मध्य प्रदेशातील विजयाची जोरदार चर्चा रंगली असून या विजयामागं मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची लाडकी बहना योजना असल्याचं बोललं जात आहे. या निवडणुकीत लाडली बहना योजनेचा वापर करण्यात आला असून भाजपाला मोठा फायदा झाल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. आता महाराष्ट्रात देखील अशीच योजना राबवण्याचा सरकारचा मानस आहे. याआधी सरकारनं महिलांसाठी लेक लाडकी योजनाही सुरू केली आहे. मात्र, लाडली बहनासारखी योजना राज्यात सुरू झाल्यास त्याचा सरकारला मोठा फायदा होईल, असं तज्ज्ञांचं मत आहे.
हे हि वाचा 👉🏻: Winter Health Tips : हिवाळ्यातील कुठल्या वेळेतील ऊन आपल्या शरीरासाठी फायदेशीर?
महिन्याला 1250 रुपये देणारी योजना
मध्य प्रदेशात भाजपाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या लाडली बहना योजनेची जोरदार चर्चा आहे. आता इतर राज्यांनीही या योजनेकडं बारकाईनं लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. या योजनेची संपूर्ण माहिती घेऊन महाराष्ट्र राज्यही ही योजना राबवणार असल्याचं शिंदे गटाचे प्रवक्ते वैजनाथ वाघमारे यांनी सांगितलं आहे.
लाडली बहना योजनेचे स्वरूप आणि पात्रता
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ही योजना मध्यप्रदेशसाठी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत मध्य प्रदेशमधील जवळपास 1.31 कोटी महिलांना प्रत्येक महिन्याला 1,250 रुपये दिले जात आहेत.
या योजनेचा लाभ 21 ते 60 वर्षे वयोगटातील महिलांना दिला जात आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळतोय.
पण 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर मात्र या योजनेचा लाभ मिळत नाही. ज्या कुटुंबाच्या नावावर पाच एकर पेक्षा कमी जमीन आहे अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जात आहे.