PM Meloni : चीनच्या सर्वात महत्त्वाच्या प्रोजेक्ट बेल्ड अॅण्ड रोड बीआरआयमधून इटलीने माघार घेतली आहे. यासंदर्भात इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी भारतामध्ये पार पडलेल्या जी-20 शिखर संमेलनामध्ये प्रत्यक्षात भेटून चिनी पंतप्रधान ली कियांग यांना ही माहिती दिली होती.
इटलीने या महत्त्वाच्या प्रकल्पामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यामागील कारणही मेलोनी यांनी सांगितलं होतं. या प्रकल्पासंदर्भात करण्यात आलेला करार आमच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे असं इटलीने म्हटलं आहेत. इटलीने आता अधिकृतपणे या प्रकल्पामधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. इटली आता भारताबरोबरचे व्यापारी संबंध अधिक सुदृढ करण्याच्या दिशेने पावलं टाकत आहे. इटली आणि भारतामध्ये जी-20 परिषदेदरम्यान महत्त्वाच्या करारांवर द्विपक्षीय सहमीबरोबरच स्वाक्षऱ्याही झाल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी चीनबरोबर केलेला करार
इटलीमधील एका वृत्तपत्राच्या हवाल्याने दिलेल्या या वृत्तामध्ये इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्या नेतृत्वाखालील एका गटाने यासंदर्भात चिनी सरकारला आपली भूमिका कळवली आहे. या वृत्तपत्रानुसार, 3 दिवसांपूर्वी चीनला इटलीने बीआरआय सोडत असल्याची माहिती दिली आहे.
इटली 4 वर्षांपूर्वी बीआरआयमध्ये सहभागी झाला होता. 23 मार्च 2019 रोजी तत्कालीन इटालियन पंतप्रधान ग्यूसेप कोंटे यांनी चीनी राष्ट्रध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर केलेल्या करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या. चीनला सहकार्य करणारा इटली हा एकमेव देश ठरला होता.
का घेतली माघार?
बीआरआय प्रकल्पासंदर्भात इटली आणि चीनमध्ये पडद्यामागे मागील अनेक आठवड्यांपासून बैठकींचं सत्र सुरु होतं. मात्र त्याचा कोणताही फायदा झालेला नाही. परराष्ट्र मंत्री एंटोनियो ताजानी यांनी चीनबरोबरच्या या करारामध्ये इटली 4 वर्षांपूर्वी सहभागी झाला होता. मात्र यानंतर दोन्ही देशांमध्ये अपेक्षेप्रमाणे व्यापार वाढलेला नाही.
इटली या प्रकल्पामधून बाहेर पडणं हा चीन आणि शी जिनपिंग यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. इटलीने सहकार्य काढून घेतल्याने चीनला त्यांचा हा बेल्ट अॅण्ड रोड इनीशिएटीव्ह (बीआरआय) प्रकल्प पूर्ण करणं अशक्य आहे.